
•चौफेर : अमर पुराणिक•
राज्यपातळीवरील छोट्या पक्षांमुळे १९८९ पासून राज्यसभेत महत्त्वाच्या विधेयकांबाबत मोठे गतिरोध निर्माण झाले आणि ही एक मोठी समस्या बनली. त्यामुळे अनेक विकास कामात त्याचा अडथळा निर्माण झाला. आता नव्याने पुन्हा भूमी अधिग्रहण विधेयकावरुन या गतीरोधाचा सामना मोदी सरकारला करावा लागत आहे. केवळ भूमी अधिग्रहण विधेयकच नाही तर कोणतेही मोठे विकास प्रकल्प किंवा योजना राबवण्याबाबतीत आता भाजपाच्या...