
अमर पुराणिक
दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. या कार्यकारिणीच्या दिनांक ३ मार्च रोजी झालेल्या समारोपाच्या भाषणात भाजपाच्या चार हजार प्रतिनिधींना संबोधित करताना नरेंद्र मोदी काय बोलले आणि प्रसारमाध्यमांनी काय प्रसिद्ध केले किंवा प्रसारित केले हा नेहमीप्रमाणेच याही वेळी संशोधनाचा मुद्दा आहे. नरेंद्र मोदी जे बोलतात त्यातील केवळ स्वत:च्या सोयीचीच विधाने तीही...