
डॉ. मनमोहन वैद्य
अखिल भारतीय प्रचारप्रमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
घुसखोर म्हटलं की आपल्या मनात सीमेपलीकडून आपली सुरक्षा व्यवस्था भेदून आपल्या देशात घुसणारी परदेशी माणसंच येतात. त्यांच्यामुळे निर्माण होणार्या राष्ट्रीय सुरक्षा, देशांतर्गत कायदा व्यवस्था, रोजगार, सामाजिक तणाव आदी देशाला भेडसावणारे प्रश्न डोळ्यांपुढे येतात. ही भौतिक पातळीवरील घुसखोरी झाली; व त्याचा योग्य बंदोबस्त करायला...