
भाष्य - मा. गो. वैद्य
गेल्या शनिवारी म्हणजे दि. १५ सप्टेंबर २०१२ ला माजी सरसंघचालक श्री सुदर्शनजी यांचे रायपूरला निधन झाले. कुप्पहळ्ळी सीतारामय्या सुदर्शन असे त्यांचे पूर्ण नाव. ते जन्माने मराठी भाषी असते, तर हेच नाव सुदर्शन सीतारामय्या कुप्पहळ्ळीकर असे झाले असते. त्यांचे मूळ गाव कर्नाटकातील कुपहळ्ळी. सीतारामय्या हे त्यांचे वडील.
सार्थकता आणि धन्यता
दिनांक १८ जून १९३१ हा त्यांचा जन्मदिन आणि १५...