
प्रा. ए. डी. जोशीआपल्या देशात सारे काही आहे. रम्य वनश्री आहे. खळखळ वाहणार्या नद्या आहेत. धीरगंभीर आणि खवळणारे अथांग सागर आहेत. रम्य सागर किनारे आहेत. घनदाट जंगल आहेत. त्यात फिरणारे प्राणी आहेत. आकाशात विहार करणारे अनेक प्रकारचे पक्षी आहेत. हिमाच्छादित डोंगर आहेत. राजस्थानात वाळूचे डोंगर आहेत. ऐतिहासिक वास्तु आहेत. राजवाडे आहेत. डोळे दिपवणारा ताजमहाल आहे. पौराणिक स्थळे आहेत. सर्व देव देवतांचे वास्तव्य...