This is an example of a HTML caption with a link.
Recent Post
माझी मुलगी प्रज्ञा काही नेते उघडपणे प्रज्ञाच्या समर्थनार्थ पुढे आले नाहीत, त्यामुळे मी अजीबात विचलित झालेलो नाही. कारण माझ्या मुलीने काहीही चुकीचे केलेले नाही. मालेगाव स्फोटात प्रज्ञाचा हात नाही, याची मला 99 टक्के खात्री आहे. एक टक्का यासाठी नाही कारण, गेल्या दोन वर्षांपासून ती साध्वी आहे आणि ती माझ्या येथील घरी आलेली नाही. कारण साध्वीने आईवडिलांच्या घरी यायचे नसते, असा नियम आहे. ती आता मला "पिताजी'...
दहावीनंतर योग्य करिअर निवडणे हेच यशाचे खरे गमक हत्ती आणि सात आंधळ्यांची गोष्ट आपण प्रत्येकानेच कधी ना कधी तरी ऐकलेली असेल. शेवटपर्यंत खरा हत्ती आहे कसा? हे सातही जण अचूकपणे सांगू शकत नाहीत. आपल्याला त्या हत्तीचा जो अनुभव आला, त्या आधारे प्रत्येकाने हत्तीचे वर्णन केले. असे का घडले? साधक-बाधक विचार, सर्वांगीण अभ्यास, चौकस आकलन क्षमता आणि मर्मदृष्टी यांच्या अभावी असे घडले. सातही जणांनी आपल्या अनुभवाचे...
किशोरी आमोणकर यांच्या प्रकट मुलाखतीची रसयात्रा भावार्थ सौंदर्याची प्रतिमा रागातून प्रकट होणे आवश्यक (अमर पुराणिक) हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील रागांना स्वभाव आहे, राग-स्वरांच्या समूहातून रागाच्या भावांचे प्रकटीकरण झाल्याशिवाय गाणे हृदयाला भिडत नाही, असे प्रतिपादन पद्मविभूषण गानसरस्वती किशोरी आमोणकर यांनी केले. हिराचंद नेमचंद वाचनालय, सोलापूर व श्रीराम पुजारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने...
निवेदनाच्या क्षेत्रात देखील मोठी संधी   प्रसिद्ध निवेदिका ज्योती आंबेकर यांनी दै. तरुण भारतशी केलेली बातचित (अमर पुराणिक) लातूरसारख्या जिल्ह्यात जन्मलेली एक साधीसुधी महिला सूत्रसंचालन, निवेदनासारख्या सामान्य क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करून दाखवते, हेच मुळात कौतुकास्पद आहे. आजपर्यंत सूत्रसंचालन किंवा निवेदनासारख्या क्षेत्रांना तसे वलय प्राप्त झालेले नव्हते, पण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध निवेदिका...
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन अमर पुराणिक ६ डिसेंबर १९५६ साली दिल्लीत अलीपूर रोड येथील निवासस्थानी निद्रावस्थेतच बाबासाहेबांचे निधन झाले. दिल्लीहून त्यांचे पाथिर्र्व विमानातून रात्री ३.१५ वा. मुंबईत आणण्यात आले. रात्री सांताक्रूझ विमानतळावर सुमारे २५ हजारांचा जमाव जमला होता. त्यानंतर ऍम्ब्युलन्समध्ये त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले. बाबासाहेबांचा चेहरा सर्वांना दिसावा म्हणून ऍम्ब्युलन्समध्ये...
बँकिंग क्षेत्रातील तंत्रज्ञानाची क्रांती (अमर पुराणिक) २१ व्या शतकात सर्वच क्षेत्रांतील कामांची गती प्रचंड वाढली आहे. टेक्नॉलॉजी प्रगत झाल्याने माणसाची काम करण्याची गतीदेखील वाढली आहे. गेल्या २०, २५ वर्षांत तंत्रज्ञानाचा झपाट्याने विकास झाल्याने बँकिंग क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती होऊन ते जलद, अचूक आणि पारदर्शक झाले आहे. ग्राहक घरबसल्या, दिवसातल्या कोणत्याही वेळी बँकेचे व्यवहार करू शकतात. पूर्वीप्रमाणे...
गर्भाशयाच्या शस्त्रक्रियेला पर्याय ‘बलून थेरपी’ सततच्या वैद्यकीय संशोधनाद्वारे संततीनियमनासाठी नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आले आहे. यापूर्वी वापरल्या जाणार्‍या तंत्रामंध्ये तात्पुरत्या संतती नियमानासाठी निरोध, संततीनियमनाच्या गोळ्या, कॉपर-टी  आशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत, पण कायमस्वरुपी उपाय म्हणून मात्र गर्भाशय काढून टाकणे हाच पर्याय इतके दिवस वापरला जात होता, पण आता गर्भाशयाच्या शस्त्रक्रियेला...
आनंद देशपांडे यांची किल्ले भटकंतीची सफर ‘कातळमनीचा ठाव’  हृदयाचा ठाव घेणारे लिखाण •अमर पुराणिक• ऍड. आनंद देशपांडे एक शिवरायभक्त, उदयोन्मुख लेखक, ज्यांचे लेखन त्यांच्या वयापेक्षा २० वर्षांनी प्रगल्भ आहे. ज्यांच्यावर गो.नी. दांडेकर व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे अशा दिग्गजांचे संस्कार झाले आहेत. १ जून २००९ रोजी गो.नी. दांडेकरांच्या पुण्यतिथीदिनी आनंद देशापांडे यांच्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन गोनीदांच्या...
वेतनवाढ मंजूर, पण देणार कोठून?  - अमर पुराणिक  - केंद्राने आपल्या कर्मचार्‍यांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसी सहा महिन्यांपूर्वीच देऊ केल्या. त्याचीच री ओढत राज्य शासनांनीही वेतनवाढ दिली. काही राज्यांनी तत्काळ वेतनवाढ दिलीही, तर बाकीच्यांनी वेळकाढूपणा केला. महाराष्ट्र शासनही त्यातलेच. पण दोन महिन्यावर आलेल्या निवडणुकीसाठी सहाव्या वेतन आयोगाचा गाजरासारखा वापर सुरू आहे. शासकीय कर्मचार्‍यांची...
...आणि बुद्ध हसला! सन्मानजनक भारताच्या बुद्धिसामर्थ्याची प्रचिती  : पोखरणच्या ‘ऑपरेशन शक्ती’ची(अमर पुराणिक) राष्ट्रतेज अटल बिहारी वाजपेयी मिसाईल मॅन’ डॉ. अब्दुल कलाम  ‘...आणि बुद्ध हसला’! माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी प्रचंड आत्मविश्‍वास आणि आत्मसन्मानाने नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. दिवस होता दि. ११ मे १९९८. कारण होते पोखरण येथे झालेल्या ‘ऑपरेशन शक्ती’ या नावाने ओळखल्या...
सृष्टीचा मनभावन श्रावणअमर पुराणिकश्रावणमास हा हिंदुधर्मशास्त्रातील सर्वात महत्त्वाचा व अत्यंत पवित्र महिना आहेे. जसे दिवे घासून पुसून स्वच्छ करतात, तसेच देवोपासनेने मनही लख्ख करणारा श्रावण. अशा स्वच्छ आणि स्वात्विक मनाचेच प्रतिबिंब श्रावण महिन्यात पडत असते. श्रावणी सोमवार, प्रदोष या पर्वकाळाचे श्रावणात विशेष महत्त्व असते. सर्व देवांचा देव महादेव, भगवान शिव, त्याला प्रसन्न करण्यासाठीच जणू हा महिना...
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या (१५ सप्टेंबर १८६१ - १४ एप्रिल १९६२). ·अमर पुराणिक·   मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या हे कर्नाटक राज्यातील चिकबळ्ळापूर तालुक्यातील कोलार जिल्हयातील मुद्देनहळ्ळी या गावी जन्मलेले भारत देशाचे भाग्यविधाते अभियंते व नागरीक होते. सन १९५५ मध्ये त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च सन्मान मिळाला. ब्रिटीशांनी पण त्यांना, त्यांनी केलेल्या चांगल्या जनहिताच्या कामामुळे...
श्रीनिवास रामानुजन(२२ डिसेंबर १८८७ : तंजावर -२६  एप्रिल  १९२०) ·अमर पुराणिक·  श्रीनिवास रामानुजन हे महान भारतीय गणितज्ञ होते. त्यांची प्रतिभा अलौकिक होती. रामानुजन यांच्या ध्यानी-मनी-स्वप्नी सतत गणितच असे. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे. आणि म्हणूनच की काय कोण जाणे पण अनेकदा रामानुजन झोपेतून जागे होताच अतिशय अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत.अशा या महान गणितज्ञाचा...
नितीन गडकरी : स्वयंसेवक ते पक्षाध्यक्ष ·अमर पुराणिक·  भाजपा नेते नितीन गडकरी यांच्या भाजपाध्यक्ष पदाच्या कारकीर्दीला नुकतीच दोनवर्षे पूर्ण झाली. त्यांनी आपल्या गेल्या दोन वर्षांच्या कारकीर्दीत देशभर दौरे करून भाजपाला नवसंजीवनी दिली, नवचैतन्य निर्माण केले. राष्ट्रीय स्तरावर आज गडकरींनी भाजपाला एका नव्या उंचीवर नेले आहे. येत्या काळातही ही चढती कमान चढतीच राहणार आहे! त्यांच्या अद्भुत कार्यशैलीचे...