This is an example of a HTML caption with a link.
Recent Post
जलवायू परिवर्तन व भारताची भूमिका •अमर पुराणिक जगाच्या किंवा देशाच्या विकासाचा संबंध हा प्रामुख्याने औद्योगीकरणाशी घातला जातो आणि जीवनमा सुधारणे याचा अर्थ जीवनात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे असा घेतला जातो. या सगळ्या गोष्टींना विकास असे म्हणण्याची प्रथा पडून गेली आहे. या विकासापोटी अनेक नैसर्गिक स्त्रोतांवर कुर्‍हाड कोसळली आहे. शेती, पाणी, जंगल या सगळ्यांना विकासाने गिळंकृत केले आहे. विकासाच्या...
•अमर पुराणिक स्वातंत्र्यप्राप्तीनंतर खरे तर जातिव्यवस्था मोडून काढण्याच्या दृष्टीने स्वातंत्रवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप प्रयत्न केले होते. स्वा. सावरकरांना ब्राह्मण समाजाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. तेव्हा स्वा. सावरकरांनी त्यांच्या भाषणात ‘ज्या घटना अखंड हिंदुस्थानाला आणि हिंदुत्वात बाधा निर्माण करु शकतील अशा कोणत्याही संघटनांच्या...
चीनची सामरिकनिती आणि भारताविषयी धोरणे •अमर पुराणिक सीमानिश्‍चितीचे स्पष्ट निर्धारण नसल्याने आपल्या देशावर काय संकटे येऊ शकतात, याचा सध्या सुरु असलेल्या चीनी घुसखोरीचा छोटासा नमुना आहे. सध्याचे सरकार अशा घटना घडतच असतात(?) असे सांगत वेळ मारून नेत आहे. हा प्रकार संपुआ सरकारने गंभीरपणे घेतलेला दिसत नाही. भारताला स्वातंत्र्य मिळून ६० वर्षे झाली. या साठ वर्षांत ७ ते ८ वर्षांचा काळ सोडला तर कॉंग्रेसच सत्तेत...
दरिद्रयाच्या खाईत रुततोय देश •अमर पुराणिक जगातील कोणताही देश ठाम धोरणे, देशाच्या प्रगतीप्रती तीव्र आस्था व वर्षानुवर्षे अखंड प्रयत्न केल्याशिवाय मोठा होत नसतो.  सर्व मोठी राष्ट्रे ही अशाच अथक व प्रामाणिक प्रयत्नातूनच मोठी झाल्याचे दिसून येते. भारताला नैसर्गिक व ऐतिहासिक देणगी असतानाही गेल्या काही काळापासून भारत दिवसेंदिवस मागे पडतोय याची कारणे काय असावीत? अर्थात याला अनेक कारणे आहेत. यातील महत्त्वाचे...
हेल्दी(?) नेत्यांची वेल्थ गेम देशाच्या अबू्रचे धिंडवडे काढणारा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धातील भ्रष्टाचार •अमर पुराणिक कॉमनवेल्थ गेम्स अर्थात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरु व्हायला केवळ ६० दिवस राहिले असताना यातील प्रचंड मोठी भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस येत आहेत. कोण म्हणतेय, कॉमनवल्थ गेम्स म्हणजे, हा पैशाचा अपव्यय आहे, तर कोण म्हणतो की नेते व सरकारी अधिकारी कर्मचार्‍यांना अतिरिक्त कमाईसाठीच या खेळांचे...
एंडरसनला पळवण्यास जबाबदार कोण? •अमर पुराणिक भोपाळ येथे २६ वर्षांपुर्वी युनियन कार्बाईडची गॅस दुर्घटना भारताच्या इतिहासातील सर्वात भीषण औद्योगिक दुर्घटना आहे. या घटनेला ज्या व्यक्ती जबाबदार आहेत त्यांना शिक्षाही तितकीच मोठी होणे अपेक्षित होते. स्वाभाविकच भोपाळच्यामुख्य न्यायाधीशांकडून सुनावलेल्या निकालानंतर सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला गेला, आणि न्यायव्यवस्था व राजकिय यंत्रणेवरील जनतेचा विश्‍वास...
अणू दुर्घटना : नुकसानभरपाई विधेयक आणि तथ्य ·अमर पुराणिक कॉंग्रेस सरकारने अणू दुर्घटना नुकसानभरपाई विधेयकाबाबत आश्‍चर्यचकित करणारी भूमिका घेतली आहे; त्यामुळे संपुआ सरकार कोणत्या तंद्रीत आहे, हेच समजत नाही. अशी भूमिका घेतल्याने लोकशाहीच्या निरोगी तत्त्वांच्या विकासाला बाधा पोहोचते. याला भारतीय राजकारणाचा विकृत पैलू मानला जाईल. निवडणूक जिंकणार्‍यांचा अहंकार वाढतो. त्यातच दुसर्‍यांदा निवडणूक जिंकली म्हटल्यावर...
‘कातळमनीचा ठाव’ : हृदयाचा ठाव घेणारे लिखाण ·अमर पुराणिक  आनंद देशपांडे एक शिवरायभक्त, उदयोन्मुख लेखक, ज्यांचे लेखन त्यांच्या वयापेक्षा २० वर्षांनी प्रगल्भ आहे. ज्यांच्यावर गो.नी. दांडेकर व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे अशा दिग्गजांचे संस्कार झाले आहेत. १ जून २००९ रोजी गो.नी. दांडेकरांच्या पुण्यतिथीदिनी आनंद देशापांडे यांच्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन गोनीदांच्या कन्या व जावयांच्या हस्ते झाले होते....
छाया-प्रकाशाचा खेळिया... एखाद्या छायाचित्रकाराला देखील ग्लॅमर मिळावे आणि तो सेलिब्रिटी ठरावा हे कर्तृत्व राजाध्यक्षांनीच पहिल्यांदा करून दाखविले होते. प्रत्यक्षाहूनही प्रतिमांची नवी, रेखीव आणि सुंदर अशी सृष्टी निर्माण करणारा अन् छायाचित्रणाला कलेचा दर्जा मिळवून देणारा एक सौम्य, मंदमंद पाझरणारा अन् निशिगंधाच्या सुगंधासारखा बहरणारा एक कलावंत थांबला आहे. त्याने गाजविलेल्या काळाचे एक स्थिरचित्र कायमचे...