ज्वलंत प्रतिभेची सुजाता आणि भुंकणारा भालू

सडेतोड : अरुण रामतीर्थकर
 पण असे होणार नाही जाज्वल्य देशाभिमानी सुजाता पाटीलवर कारवाई होईल आणि धर्मद्रोही, राष्ट्रद्रोही भालचंद्र नेमाडे हा मोकाट सुटेल. कारण हा देश आता देशभक्तांचा राहिलेला नाही. याचे मूळ आपलाच नाकर्तेपणा आणि आंधळे मतदान यात आहे.
जानेवारी २०१३ च्या पहिल्या पंधरवड्यात साहित्यिक आविष्काराची दोन रूपे प्रगट झाली. एक जेवढे संतोषजनक होते तेवढेच दुसरे संतापजनक होते. दोन महिन्यांपूर्वी नितीन गडकरी म्हणाले होते. देव सर्वांना बुद्धी देतो. त्याचा चांगला वापर केला तर स्वामी विवेकानंद होतो आणि वाईट वापर केला तर दाऊद इब्राहिम होतो. मूर्ख कॉंग्रेसवाले आणि मंदबुद्धीच्या पत्रकारांनी त्यावर दाऊद-विवेकानंद यांची तुलना केली असे काहूर उठवले. हा शुद्ध आचरटपणा होता. त्याचाही अपमृत्यु झाला. सांगण्याचा हेतु बुद्धीप्रमाणे प्रतिभेचे आहे. ती सर्वांना असते. खेड्यातील बहिणाबाईंनी कविता केल्या तेव्हा त्या कुठे प्रसिद्ध झाल्या. कालांतराने त्यांच्या सुपुत्राने त्या प्रसिद्ध केल्यावर मराठी सारस्वत समृद्ध झाले. अन्यथा ही प्रतिभा काळाच्या ओघात लुप्तही झाली असती. प्रतिभेचे प्रगटीकरण जसे महत्त्वपूर्ण तसेच प्रतिभेचे प्रमाण हेही महत्त्वाचे आहे. काही जणांच्या बाबतीत प्रतिभेचा झरा अखंड वाहतो, तर काहींचा लवकर आटतो. त्यांची मर्यादाच तेवढी असते.
या विवेचनामागे सुजाता पाटील ही नवोदित कवयित्री आणि भालचंद्र नेमाडे हे बुजुर्ग लेखक यांची तुलना आहे. सुजाता पाटील या मुंबई पोलीस दलात इन्स्पेक्टर या पदावर कार्यरत आहे. मराठीच्या प्राध्यापकाच्या प्रतिभेपेक्षा डॉक्टर, इंजिनीयर, पोलीस सैनिक यांची अल्पस्वल्प प्रतिभाही महत्त्वपूर्ण असते. मुंबई पोलिसांचे एक मासिक निघते. इतर कार्यवृत्तांताबरोबर दलातील लेखक, कवी यांचे साहित्य प्रसिद्ध होते. ११ ऑगस्टचा मुंबईतील प्रकार आपल्याला माहितीच आहे. रझा अकादमीच्या गुंडांनी काढलेल्या मोर्चानंतर शहीद पोलीसांच्या स्मारकाची लाथा मारून तोडफोड करण्यात आली. हा राष्ट्रद्रोही प्रकार होता. त्याचवेळी तेथे बंदोबस्तास असलेल्या महिला पोलिसांचा विनयभंग झाला. तरीही लाठीमार गोळीबार झाला नाही. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे किडे सोडले तर बाकी सर्वांना त्याचा संताप आला. सुजाता पाटील त्यापैकीच एक. कदाचित या घटनेच्या त्या नेत्रसाक्षीदार असल्यामुळे त्यांचा संताप इतरांपेक्षा शतपट अधिक झाला. वेदनेतून कविता जन्मते असे म्हणतात. येथे वेदनेला संतापाची जोड होती. त्यातून हे काव्य स्फुरले (अंशतः)
हौसला बुलंद था
इज्जत लुट रही थी
हिम्मत की गद्दारोने
अमर ज्योती को हाथ लगाने की
काट देते हाथ उनके तो
फरयाद किसी की ना होती
साप को दूध पिलाकर
बात करे हम भाइचारेकी
अमर ज्योती तोडणारे आणि महिला पोलिसांचा विनयभंग करणारे हात तोडायला हवेत यात आक्षेपार्ह काय? उलट वेदनेचे यथार्थ प्रकटीकरण आहे. रझा अकादमीच्या कृत्याबद्दल क्षमायाचना करत किती मुस्लिम संघटना पुढे झाल्या? एकही नाही. मात्र वेदना प्रगट होताच. आक्षेपार्ह म्हणून शंखध्वनी सुरू झाला. म्हणजे मूळ घटना आक्षेपार्ह, ती दुर्लक्षित ठेवायची. प्रतिक्रियाच महत्त्वाची. कसाबला फाशी दिल्यावर नमाजानंतर त्याला श्रद्धांजली अर्पण केली जातो. १५ मिनिटात तमाम हिंदूंना ठार मारतो असे म्हणणार्‍या ओवेसीला अटक झाल्यावर ओवेसीचे समर्थन करत जुन्या हैद्राबादेत हिंसाचार होतो. ‘सापको दूध पिलाकर बात करे हम भाइचारेकी’ या ओळी इथे समर्पकच आहेत. राष्ट्रद्रोह रक्ततात भिनलेल्यांना त्या आक्षेपार्ह वाटणारच. प्रश्‍न त्यांचा नाही. ते तसेच होते. तसेच राहणार. प्रश्न आहे सेक्युलॅरिझमची शपथ घेत राज्य करणार्‍या पृथ्वीराज चव्हाण आणि आर.आर.पाटील यांचा. ११ ऑगस्टला इज्जत गेल्यावर पोलिसांनी ६३ जणांना अटक केली. लगेच एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले आणि निरपराध लोकांना पकडल्याची तक्रार केली. अशा शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांनी भेटच घ्यायला नको होती. शेवटी ते पडले कॉंग्रेसवाले. भेट घेऊन नुसते निवेदन स्वीकारले नाही, तर पकडलेल्यांची चौकशी करून कोणी निरपराध असेल तर सोडून देऊ असे आश्‍वासनही दिले. हा पुन्हा पोलिसांवर अविश्‍वास. त्यांनी पकडलेल्यात निरपराधीही असेल असे मुख्यमंत्र्यांना वाटणे म्हणजे लाचारीची परमावधी झाली.
सुजाता ताईंच्या ‘संवाद’मधील कवितेवर याच लोकांनी आक्षेप घेतल्यावर यात आक्षेपार्ह काय, असा प्रतिप्रश्‍न न करता आर.आर. पाटलांनीही लोटांगण घातले. ‘संवाद’च्या संपादकांना माफी मागायला लावली आणि अशी कविता पोलिसांच्या मासिकात प्रसिद्ध झालीच कशी याच्या चौकशीचे आदेश देऊन संवादचे वितरण रोखले. आता बंटी जहागिरदारच्या पक्षाचे आर.आर. पाटील स्वाभिमानी, देशप्रेमी इन्स्पेक्टर सुजाता पाटील यांना पदावनत करतात की नोकरीतून बडतर्फ करतात हे पाहायचे. ‘पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार’ अशी आजची अवस्था आहे. देशप्रेम हा गुन्हा ठरत आहे.
प्रतिभेचा दुसरा आविष्कार म्हणजे भालचंद्र नेमाडे. ५० वर्षांपूर्वी त्यांची ‘कोसला’ गाजली. ५० वर्षांत त्यांची प्रतिभा आटली, पण लेखक म्हणवून घेण्याची खाज संपेना. मग ‘अडगळ’ नावाचे एक वेडगळ पुस्तक या गृहस्थाने लिहिले. वेडगळ म्हणजे कामालीचे वेडगळ. १९२२ साली भाजीच्या टोपलीतून गुप्त कॅमेरा नेऊन त्याने फाशीचे चित्रीकरण केले हे या भालूचे वाक्य. १९५८ सालच्या चर्चेत पंतप्रधान नरसिंहराव यांचा उल्लेख येतो. एरवी या पुस्तकाची भरपेट टिंगल झाली असती. मग कारण नसताना पुस्तकाच्या नावात हिंदू धर्माला अडगळ म्हणण्यात आले. या नावामुळे काहींना हा नेमाडे थोर लेखक वाटला. वाद होऊन मिळालेली प्रसिद्धी वितळल्यावर भालूने चिपळूणला चक्क अकबर ओवैसीचे समर्थन केले. म्हातारचळ लागलेला भालू एवढ्यावर थांबला नाही, तर ओवैसीचे विधान म्हणजे सावरकर विचारांची प्रतिक्रिया मानून सावरकरांनाच दोष दिला. १९२२ साली गुप्त कॅमेराच नव्हता हे भालूला माहिती नाही. मग २२ साली सावरकरांनी मांडलेले आणि आजही लागू पडणारे विचार त्यांच्या आकलनशक्तीपलीकडचे आहेत. ओवैसीची बाजू घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली की, आपण पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात येऊ एवढी नेमाडेची क्षुद्र प्रतिभा. त्याच्या बडबडीस भुंकणे हा शब्द वापरून श्‍वानवर्गाचा अपमान होतोय. पादत्राणेही तशीच तक्रार करतील. माझ्या मते ओवैसेचे वक्तव्य देशद्रोही म्हणून राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली त्याला अटक होत असेल तर ओवैसेचे समर्थन करणार्‍या भालचंद्र नेमाडे यालाही राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली अटक होऊन मरेपर्यंत एकांत कोठडीत ठेवायला हवे.
पण असे होणार नाही जाज्वल्य देशाभिमानी सुजाता पाटीलवर कारवाई होईल आणि धर्मद्रोही, राष्ट्रद्रोही भालचंद्र नेमाडे हा मोकाट सुटेल. कारण हा देश आता देशभक्तांचा राहिलेला नाही. याचे मूळ आपलाच नाकर्तेपणा आणि आंधळे मतदान यात आहे.

0 comments:

Post a Comment