पाकिस्तानशी क्रिकेट ही तर लाचारी

 सडेतोड : अरुण रामतीर्थकर
भारत-पाक क्रिकेट म्हणजे धार्मिक तणावाला कारण असते, हे पोलीस खातेही मान्य करेल. धार्मिक तणाव निर्माण झाला तरी होऊ दे पाकिस्तानी संघ येथे येऊन क्रिकेट खेळणारच ही भूमिका मान्य होणार असेल तर मंदिर वही बनाएंगे या गीतावर बंदी का? अफझल खानाचा वध आणि शाहिस्तेखानाची बोटे तोडली हे ऐतिहासिक प्रसंग देखावा म्हणून वापरण्यावर बंदी का? भारतमाता की जय आणि वंदे मातरम् अशी घोषणा विशिष्ट भागात देण्यावर बंदी का? वरिष्ठांच्या हट्टाने धार्मिक तणाव वाढला तर चालतो आणि जनसामान्यांच्या भावनांचे प्रगटीकरण तेवढे आक्षेपार्ह ठरते.

    वर्ष सरताना पाकिस्तानचा क्रिकेट संघ भारतात येणार आहे आणि काही सामने खेळणार आहे. कोठे खेळणार हे अद्याप जाहीर झालेले नाही. मात्र महाराष्ट्रात एकही सामना येणार नाही हे नक्की हे पाकडे महाराष्ट्रात पाऊल टाकणार नाहीत याचे श्रेय शिवसेना आणि मनसे यांना द्यावे लागेल. क्रिकेट मंडळाच्या अंगात हिम्मत असेल तर महाराष्ट्रात सामना खेळवून दाखवावा. क्रिकेटचाच विचार केला तर त्या हरामींशी खेळले नाही म्हणून आपले काही अडत नाही. कॅनडा, आयर्लंडपासून ऑस्ट्रेेलिया, इंग्लंडपर्यंत क्रिकेट खेळणारे सर्व देश आपल्याला निमंत्रण द्यायला किंवा आपल्या निमंत्रणाचा स्वीकार करायला तयार असतात. पाकिस्तानचे तसे नाही. एखादा आंतरराष्ट्रीय सामना खेळायचा असेल तर पाकिस्तानी संघाला विदेश दौरा करावा लागतो. भारताशी कायम वैर भावनेने वागणारा पाकिस्तान क्रिकेट क्षेत्रात असा एकाकी पडला असताना त्याचे एकटेपण घालवायची आपल्याला गरजच काय?
सरकारी माहितीच सांगते की, पाकिस्तानी संघाच्या दौर्‍याच्या वेळी ७०० ते ८०० पाकिस्तानी अधिकृतपणे भारतात येतात. दौरा संपल्यावर त्यापैकी निम्मेही परत जात नाहीत. एकीकडे सीमेवर आमच्या जवानांनी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून कडा पहारा द्यायचा. घुसखोरांच्या गोळीबाराला उत्तर देत घुसखोर मारायचे आणि दुसरीकडे क्रिकेटच्या नावाखाली प्रत्येक वेळी ४००-५०० घुसखोर भारतात येऊन कायमचे रहिवासी होत असतील तर सीमेवर पहार्‍याचा खर्च कशाला? पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या प्रत्येक दौर्‍याच्या वेळी घुसखोर फायदा घेतात हे लक्षात येऊनही पुन्हा निमंत्रण म्हणजे या लोकांना देशहिताची अजिबात चाड नाही असाच होतो. गेल्या काही दिवसांत पकिस्तानी सैनिक युद्धबंदीचाभंग करत भारतीय चौक्यांवर सतत गोळीबार करत आहेत. पाकिस्तानी हद्दीतून खोदलेले आणि भारतीय हद्दीत निघालेले भुयार सीमावर्ती भागातील एका हिंदू शेतकर्‍याच्या सतर्कतेने सापडले. मित्रत्वाच्या कोणत्या चौकटीत या गोष्टी बसतात. कसाबचा मुद्दा तर न उगाळण्यासारखा आहे.
क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे पैशासाठी हपापलेले लोक आहेत. त्या लोकांना पैशापुढे देशहिताची किंमत राहिलेली नाही हेच सिद्ध होते. त्या लोकांच्या अंगात मस्ती यायला आपणही कारणीभूत आहोत. क्रिकेट आणि क्रिकेटपटू यांना आपण नको एवढे डोक्यावर घेतो. आंधळेपणाने. त्यामुळे क्रिकेट नियामक मंडळ असा दौरा आखण्याचे धाडस करू शकते. मुळात भारत-पाक क्रिकेट हीच अनावश्यक बाब आहे. भारतातील प्रत्येक शहरात पाकिस्तानी प्रेमी मुस्लिम मोठ्या संख्येने असतात. सच्चा हिंदुस्थानी म्हणावे असे मुस्लिम फारच अल्पसंख्येत असतात. भारत-पाक सामना झाला आणि तो पाकने जिंकला की मुस्लिम मोहल्ल्यातून रात्री ११ वाजता फटाक्यांची आतषबाजी मी स्वतः अनेकदा ऐकली. फटाके कोठे उडवले ती जागा शोधणे व संबंधितांना पकडणे हे फार सोपे आहे, पण पोलीस ते कष्ट घेत नाहीत. रात्री मुस्लिम वस्तीत आरोपी पकडायला गेले तर जीव जाईल अशी पोलिसांना भीती वाटते. असेही आहे की किरकोळ भांडणातून एचएम मॅटर झाला आणि पोलिसांनी ८ एच ४ एम पकडले तर त्या ४ एमना सोडण्यासाठी कॉंग्रेसचेे नगरसेवक, आमदार किती आटापिटा करतात. खाली मान घालून सर्वांना सोडूनच द्यायचे तर पकडायचे कशाला असाही विचार पोलीस करत असतील. पाकिस्तानकडून हरलो यामुळे मन आधीच खिन्न झाले असताना फटाक्याची माळ लावलेली ऐकू आली तर काय वाटेल?
भारत-पाक क्रिकेट म्हणजे धार्मिक तणावाला कारण असते हे पोलीस खातेही मान्य करेल. धार्मिक तणाव निर्माण झाला तरी होऊ दे पाकिस्तानी संघ येथे येऊन क्रिकेट खेळणारच ही भूमिका मान्य होणार असेल तर मंदिर वही बनाएंगे या गीतावर बंदी का? अफझल खानाचा वध आणि शाहिस्तेखानाची बोटे तोडली हे ऐतिहासिक प्रसंग देखावा म्हणून वापरण्यावर बंदी का? भारतमाता की जय आणि वंदे मातरम् अशी घोषणा विशिष्ट भागात देण्यावर बंदी का? वरिष्ठांच्या हट्टाने धार्मिक तणाव वाढला तर चालतो आणि जनसामान्यांच्या भावनांचे प्रगटीकरण तेवढे आक्षेपार्ह ठरते. या एका दौर्‍याने घुसखोरांना प्रतिबंध या धोरणाने तीन तेरा वाजतात आणि कमकुवत धार्मिक सलोख्याचे सशक्त धार्मिक तणावात रूपांतर होते यासाठीच हा दौरा नको.
असे असले तरी पाकिस्तानी संघ भारताच्या ज्या शहरातील विमानतळावर येईल. तेेथून बोहर पडता येत नाहीत कारण हजारो निदर्शक गो बॅक म्हणत रस्ता अडवून बसलेत असे दृश्य दिसणार नाही. उलट या सामन्याची तिकिटे मिळावीत म्हणून पोलिसांच्या लाठ्या खात रांग लावतील. या पामरांना दोष काय द्यायचा? खेळात राजकारण नाही असा त्यांचा बुद्धीभेद केला जातो. महेश भट्ट, कुलदीप नय्यर, प्रशांत भूषण अशा मोजक्या लोकांच्या नावावर मी काट मारली आहे. गायिका म्हणून कितीही थोर असल्या तरी आशा भोसले हे नाव प्रिय व्यक्तींच्या यादीतून वगळले आहे. प्रसिद्ध नटी साधना ही आशा भोसलेंची भाडेकरू आहे. जुलै महिन्यात दोघींचा वाद होऊन तो पोलीस चौकीत गेला. सामान्य घरमालकाप्रमाणे आशा भोसलेंनी वागावे का हा त्यावेळी मला प्रश्‍न पडला. भांडणाची मूळ माहिती नसल्याने हा प्रसंग नगण्य ठरवला. मात्र सूरक्षेत्र या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी मुक्ताफळे उधळली. जो हट्टीपणा दाखवला त्यानंतर सावरकरप्रेमी भावंडांपैकी ही एक आहे यावरचा माझा विश्‍वास उडाला. आशा भोसलेंसारख्या व्यक्तीने पाकिस्तान्यांसाठी पायघड्या पसरल्या तर सुमार बुद्धीच्या क्रिकेटप्रेमींना किती दोष द्यायचा.
आपले परराष्ट्रमंत्री कृष्णा म्हणजे बिनडोक माणूस आहे. अर्थात शाबूत डोक्याचा मंत्री शोधावाच लागणार आहे. युनोच्या एका बैठकीत पोतुर्गीज परराष्ट्रमंत्र्याचे भाषण वाचून दाखवणार्‍या या माणसाला अक्कल नसणारच. परवाच हा कृष्णा पाकिस्तानाला जाऊन आला. तुम्ही निमंत्रण द्या, भारतीय पंतप्रधान बिनशर्त पकिस्तान भेटीवर येतील असे हा कृष्णा म्हणाला. कसाबचे पाकिस्तानातील सूत्रधार, त्यांच्यावर कारवाई आणि पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे प्रशिक्षण अड्डे या दोन मुद्यांवर आपण अनेकदा नाराजी व्यक्त केली (दुसरे काय करणार)  कृष्णाचे विधान म्हणजे कसाब करणी विसरून जा असा होतो. दहशतवादी तयार करून क्रिकेटप्रेमी म्हणून भारतात पाठवा. ते बॉंबस्फोट घडवून निरपराध माणसे मारतील. मारु देत; आमचे पंतप्रधान सदिच्छा भेटीवर येतीलच. वरिष्ठ पातळीवरून असा बुद्धीभेद अथवा देशद्रोह चालू आहे मग पाकिस्तानी क्रिकेट संघ देशप्रेमींच्या नाकावर टिच्चून येथे खेळून जाणार. तुम्ही काय करणार? कॉंग्रेसी राजवट असलेल्या आंध्रातील हैद्राबादेत मॅच असेल तर तेथे जाऊन पहाणार की सामना असेल त्यादिवशी स्पोर्टस चॅनल बघायचेच नाही असा निर्णय अमलात अणणार. सामने थोपवू शकलो नाही तरी एवढे आपण नक्कीच करू शकतो.
२3 सप्टेंबर २०१२

0 comments:

Post a Comment